उसर्ली येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा

vinod

विक्रमवीर  माजी कसोटीपटू विनोद कांबळीची उपस्थिती

पनवेल, 25 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

उसर्ली येथे माजी सरपंच विश्वास भगत यांच्यातर्फे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ फेब्रुवारी रोजी विक्रमवीर माजी कसोटीपटू विनोद कांबळी यांच्याउपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते.

माजी सरपंच  विश्वास भगत यांच्या वतीने हि स्पर्धा गेली १५ वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येते. ग्रामीण विभागातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा आकर्षण असते. आंतरराष्ट्रीय कीकेटपटू विनोद कांबळी याला पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांनी चांगलीच गर्दी केली.