खो-खो स्पर्धेमध्ये राज्यभरातील नामांकीत संघ

kho- kho

नवी मुंबई, 25 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विदयालयाच्या क्रीडांगणात 24 ते 26 तारखेपर्यंत तीन दिवस चालणा-या नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत राज्यभरातील12 पुरुषांचे व 12 महिलांचे नामांकीत संघ सहभागी झाले आहेत.

  • महिला संघ

शिवभक्त विदया मंदिर बदलापूर, विहंग स्पोर्टस ॲकेडमी ऐरोली, महात्मा गांधी स्पोर्टस ॲकेडमी मुंबई उपनगर, परांजपे स्पोर्टस क्लब मुंबई उपनगर, गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी जळगाव, छत्रपती क्रीडा मंडळ उस्मानाबाद, आर्यन स्पोर्टस क्लब रत्नागिरी, साखरवाडी खो-खो संघ सातारा, एकलव्य क्रीडा मंडळ अहमदनगर, योध्दा क्रीडा मंडळ सांगली, नरसिंह क्रीडा मंडळ पुणे व रा.फ.नाईक विदयालय कोपरखैरणे हे  महिलांचे 12 नामांकीत संघ सहभागी झाले आहेत.

kho-kho male

  • पुरुष संघ

या स्पर्धेत विहंग क्रीडा मंडळ ऐरोली, युवक क्रीडा मंडळ कल्याण, श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर, ओम समर्थ भारत मुंबई शहर, सहयाद्री विदया मंदिर भांडूप, महात्मा गांधी स्पोर्टस ॲकेडमी मुंबई उपनगर, स्व.अरुणभय्या नायकवाडी युवा मंच वाळवा सांगली, हिंद केसरी कवटे पिराण सांगली, संस्कृती नाशिक, श्रीकृष्ण क्रीडा मंडळ सातारा, शिवप्रतिष्ठान खो-खो क्लब सोलापूर, ग्रीफीन जिमखाना कोपरखैरणे हे पुरुषांचे राज्यभरातील 12 नामांकीत खो-खो संघ सहभागी झाले आहेत.

पुरुषांच्या गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर आणि स्व.अरुणभय्या नायकवाडी युवा मंच वाळवा सांगली या दोन संघात तसेच महिलांच्या गटात योध्दा क्रीडा मंडळ सांगली व रा.फ.नाईक विदयालय कोपरखैरणे या दोन संघात शुभारंभाचा सामना खेळविण्यात आला. या खो-खो स्पर्धेचा पारितोषिक ‍वितरण समारंभ रविवार,26‍ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.