ठाणे महापालिकेत मराठी राज्यभाषा दिन साजरा

rajbhasha diwas

ठाणे, 27 फेब्रुवारी 2017/AV New Bureau :

ठाणे महापालिकेने आज पालिका मुख्यालयात मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या “शंभरीची उमर गाठली” या कवितेच्या फोटो फ्रेम ला पुष्पहार घालून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज याना अभिवादन करण्यात आले .

यावेळी महापौर संजय मोरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल,  अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(2) अशोककुमार रणखांब ,उप आयुक्त (मुख्यालय)  संजय निपाणे, उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उप आयुक्त संदीप माळवी ,सहायक आयुक्त संजय शिंदे ,माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आदी अधिकारी उपस्थित होते .