केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे स्वातंंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्कनवी मुंबई,
  • 13 ऑगस्ट  2022

केंद्रीय राखीव पोलीस दल पश्चिम सेक्टर मुख्यालय, नवी मुंबई आणि लायन्स इंटरनॅशनल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, हर घर तिरंगा मिशनच्या पुढाकाराने आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 13 ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

रणदीप दत्ता, पीएमजी, पोलीस महानिरीक्षक पश्चिमी सेक्टर केरिपुबल आणि लायन्स राजेश प्रजापती यांच्या नेतृत्वाखाली आणि  रितु दत्ता, सेक्टर, कावा प्रमुख, पश्चिमी सेक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर येथील एकता विहार येथे लायन्स इंटरनॅशनल क्लब आणि केंद्रीय राखीव पोलीस दल सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांकडून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी चंद्र भूषण, पुलिस उप महानिरीक्षक, पश्चिमी सेक्टर, पी.सी. झा, पीएमजी, पोलीस उप महानिरीक्षक पश्चिमी सेक्टर, बी.एस. सिद्धू, कमाण्डेन्ट पश्चिमी सेक्टर, लायन्स डॉ. प्रताप मुदलियार,कार्यक्रम समन्वयक यांच्यासह पश्चिमी सेक्टर मुख्यालय केंद्रीय राखीव पोलीस दल अधिकारी, कर्मचारी व परिवारचे सदस्य आणि लायन्स इंटरनॅशनल क्लबचे सदस्य उपस्थित होते.