केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यपदी सुबोध महाडिक नियुक्ती

बोर्ली-मांडला, 22एप्रिल 2017 /AV News Bureau:

 मुरुड तालुक्यातील सुबोध मनोहर महाडिक यांची केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण,अन्न व सार्वजनिक वितरणालय समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  महाडिया यांच्या नियुक्तीबदद्ल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

मुरुडमधील बारशीव गावात राहणारे सुबोध महाडिक हे मनमिळाऊ आणि सर्वांना मदत करण्याच्या स्वभागामुळे मुरुड तालुक्यात ते प्रसिद्ध आहेत.  सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. मात्र प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहतात. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे असतो. त्यामुळे आपल्याकडून शक्य होईल, तेवढी मदत गरजूंना करावी, ही आपली जगण्याची रीत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

सुबोध महाडिक यांचे वडील मनोहर महाडिक बांधकाम व्यवसायिक आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या  व्यवसायात सुबोध महाडिक यांनीही आपले स्थान बळकट केले आहे. केंद्र सरकारच्या समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल समाजवादी पार्टीचे अलिबाग मुरुड विधान सभा मतदार संघाचे अध्यक्ष अशरफ घट्टे, डॉ.रेहाना घट्टे, महिला अध्यक्षा सारिका माली शिंदे यांनी पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले.