महिला दिनानिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धा

नवी मुंबई,4 मार्च 2017/AV News Bureau:

8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरीता नेरूळ येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती तसेच डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲन्ड टुरिझम स्टडिज यांनी एकत्रितरित्या ही स्पर्धा आयोजित केलीआहे.

8 तारखेला सकाळी 6.30 वा. डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय क्रिडा संकूल येथून सुरु करण्यात येणार असून नेरुळ रेल्वेस्टेशन (पू) येथील चौकातून परत डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय क्रिडा संकूल या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेची सांगता होणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या महिला मुलींनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन – http://shtsghebhararimarathon.yolasite.com/

फेसबुक आयडी – http://www.facebook.com/Womens-Mini-Marathon-121908141666805/

संपर्क : शिल्पा डी. वनिरे  7738990628,  पल्लवी चौधरी  9920355244