पनवेलमध्ये ​महाआघाडीचे शक्ती प्रदर्शन

पनवेल, 5 मार्च 2017/AV News Bureau:

शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पी आर पी आणि रिपब्लिकन सेना महाआघाडी च्या वतीने,कोकण शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार बाळाराम पाटील व जिल्हा परिषद ,पं स च्या विजयी सदस्यांची विजयी मिरवणूक शनिवारी काढण्यात आली.

पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स ऍकेडमी पासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रॅली ला प्रारंभ झाला. दोन भव्य रथांवर नवनिर्वाचित सदस्य,बाळाराम पाटील आणि आघाडी ची नेते मंडळी स्वार झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे या रॅली मध्ये सहभागी झाले होते,त्यांच्या समवेत मा आमदार विवेक पाटील,काँग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष आर सी घरत,माजी नागराध्यक्ष जे एम म्हात्रे,इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे चिटणीस श्याम म्हात्रे,शेकाप चे पनवेल तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, राष्ट्रवादी काँग्रेस चे पनवेल तालुका अध्यक्ष सुनील घरत,पनवेल शहर अध्यक्ष शिवदास कांबळे,काँग्रेस चे पनवेल शहर अध्यक्ष ऍड के एस पाटील आदी,पी आर पी चे महाराष्ट्र सहसचिव नरेंद्र गायकवाड,रायगड जिल्हा अध्यक्ष सीताराम गोविंद कांबळे,रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड आदी मान्यवर देखील सहभागी झाले होते.  सर्व समविचारी पक्षांची चिन्हे असलेले  आघाडी चे झेंडे विशेष लक्षवेधी ठरत होते.