सीवुड मध्ये बेकायदेशीर पध्दतीने पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १३ ऑक्टोबर २०२०

नवी मुंबई महापालिका हद्दीत पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून सीवुड येथे उड्डाणपूलाखाली आणि आजुबाजूच्या परिसरात बेकायदेशीरपणे उभ्या करण्यात आलेल्या बारा वाहनांवर एनआरआय पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलिसांनी १२  ऑक्टोबर रोजी संध्याकाळी धडक कारवाई केली.

 

सीवूड रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. तसेच सीवुड येथील उड्डाण पूलाखाली आणि आजुबाजूला मोठ्या बसेस तसेच अवजड वाहने उभी केलेली असतात. उड्डाण पूलाखाली दुतर्फा वाहने धावत असतात. मात्र मध्येच उभ्या करून ठेवलेल्या बसेस आणि इतर वाहनांमुळे समोरून येणाऱ्या वाहने चालकाला दिसत  नाही. त्यामुळे अपघात होण्याची भिती वाहन चालक करतात.

दरम्यान, सोमवारी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या  उड्डाण पूलाखाली उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

=======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा