होळीत सोसायट्या पोलिसांच्या रडावर

पाण्याचे फुगे, पिशव्या मारणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

नवी मुंबई, १२ मार्च २०१७ /AV News Bureau:

मागील काही काळात होळीत फुगे  तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून पाणी मारण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर इमारतींवरून पाण्याचे फुगे, पिशव्या मारणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे, इमारतीवरून स्रिया आणि मुलींवर तसे चालत्या लोकल ट्रेन, बसवर रंगाचे फुगे मारणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय कोणताही दाहक पदार्थ अथवा शस्र सोबत बाळगणे , त्याचप्रमाणे मद्यप्राशन करून वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिला आहे.