वायफाय एसटीच्या पथ्यावर

  • मोफत सेवेमुळेमहामंडळास दरवर्षी एक कोटीचा अतिरिक्त महसूल

नागपूर, 23 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

एसटीच्या बसेसमधून प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा देण्यात येते. मात्र या प्रकल्पावर महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नाही. तर दरवर्षी एक कोटी इतका वार्षिक परवाना शुल्क महामंडळास अतिरिक्त महसूल म्हणून मिळणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

राज्य महामार्ग परिवहन मंडळास एसटीमधील मोफत वायफाय सेवेमुळे नुकसान होत असल्याचा मुद्दा सदस्य प्रकाश आबिटकर, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे आदींनी उपस्थित केला होता.

एसटी बसेसमध्ये वायफाय प्रकल्प सुरु करण्यासाठी यंत्र मीडिया सोल्युशन या कंपनीची सेवा पुरवठादार म्हणून निवड करण्यात आली आहे. या राज्य परिवहन महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च राज्य सरकारने केला नाही. तरिही एसटी महामंडळास या प्रकल्पाद्वारे वार्षिक परवाना शुल्क म्हणून प्रतीवर्षी एक कोटी पाच लाख इतका अतिरिक्त महसूल पुढील पाच वर्षांसाठी प्राप्त होणार आहे. तांत्रिक कारणास्तव वायफाय उपकरण बंद पडल्यास सदर कंपनीकडून त्याची मोफत दुरुस्ती करुन देण्यात येते, असेही रावते यांनी उत्तरात म्हटले आहे.

 

 

*******************************************************************************************************************************************************************

  • डॉ.सुदर्शन रणपिसे यांना डी.लिट.