महिलांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र

नवी मुंबई, 6 जून 2017/AV News Bureau:

महिलांच्या विविध समस्या आणि प्रश्नांवर कायदेशीर मार्गदर्शन मिळावे यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राशी संपर्क साधण्यासाठी 27563505 हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध केला आहे.

महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत उप आयुक्त समाज विकास विभाग, बेलापूर भवन इमारत, पहिला मजला, से.11, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आर्थिकदृष्टया दुर्बल गरजू महिलांनी सदर मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.