नवी मुंबई पोलिसांचा ‘उत्सव’

 

नवी मुंबई,16 मार्च 2017/AV News Bureau:

नवी मुंबई पोलिसांतर्फे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘उत्सव 2017’ या संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता नेरुळच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.

उत्सव 2017 या कार्यक्रमासाठी हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी काही कलाकार आपली कलाही सादर करणार आहेत.

हा कर्यक्रम पोलीस आधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याण निधीसाठी आयोजित करण्यात आला आहे. उपलब्ध होणाऱ्या निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी अभ्यासिका, कुटुंबियांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी आणि इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला नवी मुंबईतील नागरिकांनी सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी केले आहे.