योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

लखनऊ, 19 मार्च 2019 /AV News Bureau:

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाले आहेत. तर केशव प्रसाद मोर्य आणि डॉ. दिनेश शर्मा यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सरकारमधील मंत्र्यांना गोपनियतेची शपथ दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

सपथग्रहण समारंभाला मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव उपस्थित होते.