निवडणुकीचे पडघम वाजले;  पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2023

देशातल्या निवडणुकींचे पडघम सुरू झाले असून भारतीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला.

मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार असून पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका घेवून मतदारांचा कल जाणून घेण्याची संधी सर्व राजकीय पक्षांना मिळणार आहे. तसेच या विधानसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेवूनच इतर राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणनिती प्रत्येक पक्ष आखण्याची शक्यता आहे. पुढील वर्षभर निडवणुकांचे ढोल वाजणार असून राजकीय रणधुमाळी पहायला मिळणार आहे.

========================================================