ठाण्यातील उच्च दाब विद्युत पुरवठा खंडित

ठाणे,24 मार्च 2017/AV News Bureau:

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील पोखरण रोड(२) येथील रस्तारुंदीकरणाचे काम सुरु आहे. प्रगती फिडरचे काम सुरु करण्यासाठी उच्च दाब विदयुत पुरवठा बंद करण्यात येणार आहे .

प्रगती इलेट्रॉनिक, NRB कंपनी वाधवा यांचा  उच्च दाब विदयुत पुरवठा  दिनांक २४ ,मार्च २०१७ रोजी सकाळी १०ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत विदयुत पुरवठा  बंद राहणार आहे, याची नोंद घ्यावी असे आवाहन विदयुत महामंडळाने केले आहे.