रामदास आठवले मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार

  • दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 31 जुलै 2018:

रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.  आठवले दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक  लढणार आहेत. याबाबत बांद्रा पूर्व येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतली. या बैठकीत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन निवडणूक लढण्याची आठवलेंनी घोषणा केली. प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

  •  रिपब्लिकन पक्षाच्या 61 व्या स्थापनादिनानिमित येत्या 3 ऑक्टोबर रोजी ठाण्यात प्रचंड महामेळावा आयोजित करून रिपाइं चे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आठवलेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात रिपाइं चे मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  

 

  • केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले महाराष्ट्रतून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. या पूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच पंढरपूर लोकसभा  मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी येथे लोकसभा निवडणुकीत ना रामदास आठवले सन 2009 मध्ये  पराभूत झाले होते. मात्र सन 1998 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते तेंव्हा आठवले हे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडून गेले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चेंबूर, अनुशक्तीनगर, धारावी, नायगाव,  वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले मानले जातात. त्यामुळे आठवले यांच्यासाठी हा मतदार संघ सुरक्षित असल्याचे बोलले जाते. 

 

===============================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • तालवाद्यांचा जादुगर

===============================================================================================

  • गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 4 आणखी गाड्या
    https://goo.gl/swWub6