मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक

मुंबई, 2 एप्रिल 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गाची देखभाल तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेने मेन लाइन तसेच हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील नियमित वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर मेन लाइनवरील गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे,

मेन लाइन

  • कल्याण-ठाणे अप फास्ट लाइनवर सकाळी 11.30 ते दुपारी 4 या काळात कल्याणहून सुटणाऱ्या फास्ट गाड्या कल्याण आणि ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान स्लो लाइनवरून चालविण्यात येतील तसेच या दोन्ही स्थानकांच्या दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. याशिवाय सर्व अप फास्ट मार्गावरील गाड्या नेहमीच्या स्थानकांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 10.8 ते दुपारी 2.42 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या सगळ्या डाउन फास्ट गाड्या नेहमीच्या स्थानकांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थाबविण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या 15 मिनिटे उशिरा धावतील.
  • याशिवाय गाडी क्रमांक 50104 रत्नागिरी-दादर ही गाडी दिवा स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल. तर गाडी क्रमांक 50103 दादर-रत्नागिरी ही गाडी दिवा स्थानकातून पुढच्या प्रवासाला निघेल.

हार्बर मार्गावरील गाड्या

  • कुर्ला-वाशी अप आणि डाउन गाड्या सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 मेगा ब्लॉक
  • सकाळी 10.35 ते दुपारी 3.37 या काळात सीएसटीहून पनवेल,बेलापूर आणि वाशीसाठी सुटणाऱ्या गाड्या आणि सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 या काळात पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसटीसाठी सुटणाऱ्या गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
  • या मेगाब्लॉकच्या काळात सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4 या काळात ट्रान्सहार्बर तसेच मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.