शिवसेनेचे दोन नगरसेवक भाजपमध्ये

bjp pravesh

नगरसेवक संजय आंबोले, दिनेश पांचाळ,  माजी  सभागृह नेते प्रभाकर शिंदे  यांचा भाजप प्रवेश

मुंबई, 2 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

शिवसेनेचे लालबाग परळ मधील  नगरसेवक नाना आंबोले व त्यांच्या पत्नी तेजस्वीनी आंबोले तसेच शिवाजीनगर मानखुर्द येथील नगरसेवक बबलू पांचाळ व त्यांच्या पत्नी अनिता पांचाळ आणि महापालिकेत माजी सभागृह नेते  प्रभाकर शिंदे यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसह  भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपा ने मुंबई महापालिकेसाठी पारदर्शी कारभाराचा अजेंडा हाती घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्यात जी विकासकामे करत आहेत त्या विकासकामांमध्ये आपल्याला सहभागी होता यावे म्हणून आम्ही भाजपा मध्ये प्रवेश करत आहोत असे सांगत आज दादर येथील वसंत स्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात दोन विद्यमान नगरसेवक, त्यांच्या पत्नी आणि माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनी पक्षात प्रवेश केले.

दिनेश पांचाळ यांच्यासोबत शिवसेना संपर्क प्रमूख जगजीवन पाटील, युवासेना शाखाधिकारी विजय प्रकाश भोईर,विभाग प्रमुख मधुकर चव्हाण, उपशाखाप्रमुख मोहन पाटील, प्रकाश भोईर,दिलीप शिंदे, मनोहर वैती, मोहसीन अली रशीदी, सुधाकर पाटील, महेश कदम , कार्यालय प्रमुख मेघनाथ नाईक, मोरेश्वर तांडेल, महिला शाखा संघटक संगिता तेटमे, उपशाखा प्रमुख प्रदिप हरम, प्रशांत व्हलम, सतीश वायदंडे, माथाडी कामगारसेना प्रमुख सुरेश तोडकर, योगेश गर्जे, हरिदास बंडगर, नितीन वायभासे, शिवाजी झोरे आदी कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश केल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थीत होते.