भाजप मुंबईभर नालेसफाईचे अभियान राबवणार

अविरत वाटचाल न्यूज  नेटवर्क

मुंबई, ३ मे २०१९:

लोकसभेची रणधुमाळी संपताच मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी पश्चिम उपनगरातील गझदरबांध परिसरातील नालेसफाईची पाहणी केली. कामांना सुरूवात झाली असली तरी निवडणुक कामाचे कारण सांगून पालिका अधिका-यांनी नालेसफाईच्‍या कामाकडे दुर्लक्ष तर केले नाही ना ?  असे चित्र दिसून येते आहे. त्‍याचा फायदा कंत्राटदारांनी घेत अद्याप कामाला वेगच दिलेला नाही, या झालेल्‍या विलंबाचा आयुक्‍तांनी लेखी खुलासा करावा, अशी मागणी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. याशिवाय  भाजपा मुंबईभर नालेसफाईच्‍या कामावार लक्ष ठेवण्‍याचे अभियानच हाती घेणार असल्‍याचे जाहीर केले आहे.  

  • वांद्रे, खार, सांताक्रुझ, अंधेरी, जूहू या उपनगरांच्‍या पश्चिमेकडील भागात पावसाळी पाण्‍याचा निचरा जलद गतीने होण्‍यासाठी गझदर बांध येथील नालेसफाईची कामे वेळीच पुर्ण होणे अपेक्षीत असते. तसेच गझदरबांध येथे बांधण्‍यात येणा-या पंपिग स्‍टेशनचे कामही पुर्ण होणे अपेक्षीत आहे. अन्‍यथा या कामांमध्‍ये दिरंगाई झाल्‍यास वांद्रे ते अंधेरी दरम्‍यानच्‍या  नागरी भागासह पश्चिम रेल्‍वेला पुराचा फटका बसतो. त्‍यामुळे आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी गझदरबांध परिसरातील नॉर्थ, मेन, साऊथ एव्‍ह्युन्यू यासह पीनएटी या चार प्रमुख नाल्‍यांच्‍या सफाईच्‍या कामाची व पंपिग स्‍टेशनच्‍या कामाची पाहणी केली. यावेळी महापालिका अधिका-यांसह भाजपा नगरसेविका अलका केरकर, स्‍वप्‍ना म्‍हात्रे, हेतल गाला व संबधित महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

 

  •  प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार अद्याप काही नाल्‍यांच्‍या कामांना सुरूवात झालेली नाही. पीएनटी नाला बॉक्‍स, खार पहिला रस्‍ता नाला, शास्त्रीनगर नाला, कडेश्‍वरी नाला,रिलिफ रोड नाला, आणि छोटे गटारे यांच्‍यातील गाळ काढण्‍यास अद्याप सुरूवातच झालेली नाही ही बाब अत्‍यंत चिंताजनक आहे. तर मेन एव्‍हयुन्‍यू नाला बॉक्‍स याचे काम केवळ 6 टक्‍के, नॉर्थ एव्‍हेयुन्‍यू नाला बॉक्‍सचे काम 5 टक्‍के, हरिजन कॉलनी नालाच्‍या काम केवळ 14 टक्‍के झाले आहे. बोरण नाला बॉक्‍सचे काम 4 टक्‍के झाले आहे. मोठया नाल्‍यांमध्‍ये एसएनडीटी नाल्‍यातून 23 टक्‍के, साऊथ एव्‍हेयुन्‍यू नाला 45 टक्‍के, मेन एव्‍हेयुन्‍यू नाला 37 टक्‍के,  नॉर्थ एव्‍हेयुन्‍यू नाला 83 टक्‍के, पीएनटी नाला 23 टक्‍के गाळ काढून वाहुन नेल्‍याचा दावा प्रशासनाने केला आहे. राहुल नगर 41 टक्‍के एवढीच कामे पुर्ण झाली आहेत.  दरवर्षी एच पश्चिम विभागातून  700 हून अधिक गाडया गाळ निघतो यावर्षी आजपर्यंत केवळ 245 गाडया गाळ काढण्‍यात आल्‍याचे सांगत आहेत.

दरम्‍यान, आचारसंहिता आणि निवडणुक कामात असलेल्‍या पालिका यंत्रणेचे कारण सांगत या कामाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष तर झाले नाही ना, असे दिसून येत आहे. त्‍यामुळे पालिका आयुक्‍तांनी तातडीने याबाबत लक्ष घालून यंत्रणेला कामाला वेग देण्‍याचे निर्देश देण्‍याची गरज आहे, असे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. या काळात कंत्राटदारांचे फावले असून त्‍यांनी केलेल्‍या कामाला वेग नाही त्‍यामध्‍ये पारदर्शकता असण्‍याची गरज आहे. आता मुंबई भाजपाच्‍या सर्व नगरसेवकांना आपआपल्‍या विभागातील कामांवर लक्ष देऊन एक अभियान म्‍हणून हे काम हाती घ्‍या, अशा सूचना तातडीने नगरसेवकांना दिल्‍या आहेत.

शहरातील किती गाळ काढायचा याबाबात आशिष शेलार यांनी दिलेली माहिती 

नाल्‍याचे नाव एकुण गाळ

(मेट्रीक टन)

पावसाळयापुर्वी काढावयाचा गाळ

70%

काढलेला गाळ काढलेल्‍या गाळाची टक्‍केवारी
एसएनडीटी 11,585 8109 2712 23.41
साऊथ एव्‍हेयुन्‍यू ओपन 136.5 95.55 62.01 45.42
साऊथ्‍ एव्‍हेयुन्‍यू बॉक्‍स 108 75.60 35.36 32.74
मेन एव्‍हेयुन्‍यू ओपन 795 556.5 293.33 36.89
मेन एव्‍हेयुन्‍यू बॉक्‍स 90 63 5.41 6.01
नॉर्थ एव्‍हेयुन्‍यू

ओपन

189 132.30 157.64 83.40
नॉर्थ एव्‍हेन्‍यु बॉक्‍स 90 63 5 5.55
पीनएटी नाला ओपन 1074 751.80 252.62 23.52
पीएनटी बॉक्‍स 120 84 0 0
बोरण नाला ओपन 360 252 155 43.05
बोरण नाला बॉक्‍स 358 250.60 16.79 4.57
खार 1 पहिला रस्‍ता बॉक्‍स 333.75 23.63 0 0
हरिजन कॉलनी 27.5 19.25 3.97 14.43
शास्‍त्रीनगर 175 73.5 0 0
कडेश्‍वरी 45 31.5 0 0
रिलिफ रोड 56.25 39.38 0 0
राहुल नगर 91 63.70 37.95 41.70

 

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा