11 एप्रिल रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

नवी मुंबई 6 एप्रिल 2017/AV News Bureau:

कोकण विभागीय पेन्शन अदालत मंगळवार.11 एप्रिल 2017 रोजी सकाळी 11 वाजता सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

या पेन्शन अदालतीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांमधील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रकरणाच्या अडचणीचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्‍शन प्रकरणांबाबतच्या तक्रारींचे अर्ज या दिवशी स्वीकारले जातील.

सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचा-यांची पेन्शनसबंधीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विभागीय स्तरावर पेन्शन अदालत आयोजित केली जाते. तरी संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या पेन्शनसंबंधित तक्रारी सादर कराव्यात, असे कोकण विभागीय आयुक्तांनी  कळविले आहे.