पनवेलकरांसाठी NMMTच्या दोन नवीन बससेवा

8 ऑगस्टपासून दोन्ही बससेवा  पनवेल शहरात सुरू होणार

नवी मुंबई, 7 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

पनवेल शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या सोयीसाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने एनएनएमटीच्या दोन नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल रेल्वे स्थानक ते महालक्ष्मी नगर,नेरे या मार्गावर बस क्रमांक 77 तर पनवेल रेल्वे स्थानक (पश्चिम) ते हायकल कंपनी तळोजा एमआयडीसी मार्गावर बस क्रमांक 78 धावणार आहेत. या दोन्ही बस 8 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्यामुळे पनवेल शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

  1. बस क्रमांक 77 (पनवेल रेल्वे स्थानक (पूर्व) ते महालक्ष्मी नगर, नेरे (आठवड्यातील सातही दिवस)

  • एकूण बस संख्या : 4
  • बस मार्गाची लांबी  : 7.8 कि.मी.
  • प्रवासाला लागणारा वेळ : 25 ते 26 मिनिटे
  • एकूण बस फेऱ्या : 65

 

  • पनवेल रेल्वे स्थानकातून पहिली बस सकाळी 6.30 वाजता तर शेवटची बस रात्री 11.05 वाजता
  • महालक्ष्मी नगर, नेरे येथून पहिली बस सकाळी 7 वाजता तर शेवटची बस रात्री 11.30 वाजता

 

  • बसचा मार्ग:

पनवेल रेल्वे स्थानक (पूर्व), अभ्युदय बँक, श्रेयस हॉस्पिटल, नवीन पनवेल बस स्थानक, सुकापूर सर्कल, सुकापूर गाव, शासकीय वस्तीगृह, भालेवाडी, वावंजे फाटा, चिपळे फाटा, कोप्रोली गाव, रॉयल मिडोज, महालक्ष्मी नगर गेट, परिजात सोसायटी, महालक्ष्मी नगर सेक्टर 3 नेरे.

  • बसचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे  :

2.बस क्रमांक 78 (पनवेल रेल्वे स्थानक (पश्चिम) ते हायकल कंपनी तळोजा एमआयडीसी (आठवड्यातील सातही दिवस)

  • एकूण बस संख्या : 6
  • बस मार्गाची लांबी : 19.9 कि.मी.
  • प्रवासाला लागणारा वेळ : 60 मिनिटे
  • एकूण बस फेऱ्या : 45

 

  • पनवेल रेल्वे स्थानकातून पहिली बस सकाळी 6 वाजता तर शेवटची बस रात्री 10.15 वाजता
  • हायकल कंपनी तळोजा एमआयडीसी येथून पहिली बस सकाळी 7 वाजता तर शेवटची बस रात्री 11.30 वाजता

 

  • बसचा मार्ग:

पनवेल रेल्वे स्थानक, पनवेल बस स्थानक, नवीन पनवेल ब्रीज, ठाणा नाका, खांदा गाव, आसुडगाव आगार, कळंबोली सर्कल, बिमा कॉम्प्लेक्स, प्रादेशिक परिवहन कार्यालय कळंबोली, खिडुकपाडा, नावडे गाव, नावडे फाटा, पेंधर फाटा, देना बॅंक, हिन्डाल्को कंपनी, युनायटेड व्हॅन डेअर., दिपक  फर्टिलायझर्स, तोंडरे फाटा, आय जी पी एल हायवे, एक्साइट बॅटरी कंपनी, हायकल कंपनी.

  • बसचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे :