परिवहन सभापतीपदी श्याम महाडिक यांची निवड

नवी मुंबई, 6 एप्रिल 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदी शाम महाडीक यांची निवड झाली आहे. महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या निवडणुकीत शाम महाडीक विजयी झाल्याचे पिठासन अधिकारी तथा रायगड जिल्हाधिकारी शितल उगले यांनी जाहीर केले.

परिवहन समिती सभापती पदाचे उमेदवार श्याम महाडिक यांना 9 तर राजेंद्र आव्हाड यांना 3 मते मिळाली. श्याम महाडिक हे बहुमताने निवडून आल्याबदद्ल त्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.