वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे उद्या भुमीपूजन

 रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते 

मुंबई, १० जून २०१७/AV News Bureau:

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे भुमीपूजन उद्या केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे करणार आहेत. दुपारी १२ वाजता कराड येथे सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वे आणि मे. पावर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामध्ये पुणे-मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या विद्युतिकरणाबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील घोरपडी येथील वॉटर रिसाईक्लिंग प्लांटही राष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे या मार्गांचे भुमीपूजन होणार

  • वैभववाडी-कोल्हापूर नवीन रेल्वे मार्ग
  • हातकणंगले-इचलकरंजी नवीन रेल्वे मार्ग
  • फलटन-पंढरपूर नवीन रेल्वे मार्ग
  • जेऊर-आष्टी नवीन रेल्वे मार्गाच्या अंतिम स्थानकाचे सर्वेक्षण

या कार्यक्रमांना विविध ठिकाणी राज्याचे विविध मंत्री, राज्यमंत्री तसेच कोल्हापूर, सोलापूरचे महापौर आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.