खारघर, तळोजा, उलवेत 14 व 15 जून ला पाणी पुरवठा बंद

नवी मुंबई, 12 जून  2017/AV News Bureau

सिडकोने जिथे हेटवणे पाणी पुरवठा योजने अंतर्गत दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. त्यामुळे सिडकोतर्फे खारघर, तळोजा, उलवे, द्रोणागिरी व आजूबाजूची गावे या भागांत करण्यात येणारा  पाणी पुरवठा बुधवार,14 जूनला सकाळी 9 पासून  ते  15जूनला  सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

पाणी पुरवठा योजनेअंतर्गत करण्यात येणारे  दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पुरेसा पाण्याचा साठा करावा तसेच पाणी जपून वापरावे , असे आवाहन सिडकोने केले आहे.