दहावीचा निकाल उद्या 1 वाजता

नवी मुंबई,ता.12 जून 2017/ Av News breau:

गेल्या अनेक दिवसांपासून तारखांच्या गोंधळात अडकेला १० वीच्या निकालाची खरी तारीख अखेर जाहीर झाली  आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या 13 जून रोजी जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यासाठी शिक्षण मंडळाने संकेतस्थळ जाहीर केले आहेत.

दहावीचे विद्यार्थी आपला निकाल खालील संकेतस्थळांवर पाहू शकणार आहेत.

मोबाइलवर रिझल्ट मिळवा

  • आयडीया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा, डोकोमो, बीएसएनएल या मोबाईल नेटवर्कवर 58888111 या क्रमांकावर MAH10 <space> Roll Number> to 58888111
  • Bsnl या मोबाईल ऑपरेटरवर 57766 MHSSC <space>< seatno >  and send to short code 57766

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2017 मध्ये दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे.

  • निकालानंतर दुस-या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतींसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात. याबतचा अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वतःच्या स्वाक्षरीच्या प्रतीसह 14 जून ते 23 जून  या काळात शुल्क भरून अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे छायाप्रतींसाठी 14 जून ते 3 जुलै या काळात शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.
  • उत्तर पत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तर पत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थी विभागीय मंडळांकडे अर्ज करू शकतात.
  • श्रेणी सुधारण्यासाठी विदयार्थ्यांना जुलै-ऑगस्ट 2017 व मार्च 2018 मध्ये अशा दोन संधी देण्यात येणार आहेत.
  • जुलै-ऑगस्ट 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना 19 जूनपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याचे बोर्डातर्फे जाहीर करण्यात आले आहे.