मुंबईकडे येणाऱ्या ‘तेजस’चे वेळापत्रक बदलले

मुंबई, 21 जून 2017/AV News Bureau:

कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या तेजस एक्सप्रेसचे एका बाजूचे वेळापत्रक बदल्यात आले आहे. करमाळीहून मुंबईकडे येणाऱ्या गाडीची वेळ बदलण्यात आली आहे. आठवड्यातून तीन दिवस (मंगळवार, गुरुवार, रविवार) चालविण्यात येणारी तेजस एक्सप्रेस करमाळीहून यापूर्वी सकाळी 7.30 ला निघत होती. मात्र 22 जूनपासून तेजस एक्सप्रेस सकाळी 9.00 वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी तेजस एक्सप्रेसच्या बदललेले वेळापत्रक लक्षात घ्यावे आणि आपल्या प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

 22 जूनपासून गाडी क्रमांक 22120 करमाळी-सीएसटी ‘तेजस एक्सप्रेस’चे नवे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-

tejas time table