‘बसस्टॉप’ चा हटके टिजर पोस्टर लाँच 

मुंबई, 21 जून 2017/AV News Bureau:

मराठी रॅपर श्रेयश जाधव निर्मित ‘बसस्टॉप’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ह्या सिनेमाचा नुकताच एका हटके अंदाजात टिजर पोस्टर लाँच करण्यात आला. बिनछताच्या ‘निलांबरी’ बसमध्ये ‘बसस्टॉप’च्या संपूर्ण टीमने एकत्र येत सिनेमाचा टिजर पोस्टर लाँच केला.एकतर ‘माय वे’ नाहीतर ‘हाय वे’ हा या टिजर पोस्टरवरील स्लोगन आजच्या तरुणाईंची बिनधास्त विचारसरणी व्यक्त करण्यास पुरेसा ठरत आहे. येत्या २१ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

पूजा सावंत, अनिकेत विश्वासराव,अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे आणि हेमंत ढोमे हे चेहरे या पोस्टरवर झळकत असले तरी धुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर आणि विद्याधर जोशी यांची देखील यात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे हा सिनेमा जुन्या आणि नव्या पिढीच्या विचारसरणीचा नवा आयाम मांडणारा ठरणार आहे.

पोस्टरमध्ये बोल्ड, बीजी, रोमान्स, एपॉर्च्युनिटी, चान्स, ब्लफ, अफेअर हे तरुण पिढीतील विविध जीवनशैली मांडणारे शब्द देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा टिजर पोस्टर प्रथमदर्शनी पाहताना ‘बसस्टॉप’ हा सिनेमा आजच्या लाईफ स्टाईलवर भाष्य करणार असल्याचे जाणवते.