• Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Search
27.7 C
Navi Mumbai
Wednesday, October 21, 2026
Marathi News
  • Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Home ठळक बातम्या रोहयोचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जाणार
  • ठळक बातम्या

रोहयोचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जाणार

By
Siddharth Haralkar
-
June 23, 2017
Share on Facebook
Tweet on Twitter

मुंबई, 23 जून 2017/AV News Bureau:

वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय रोजगार हमी विभागामार्फत घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला  मोठ्या प्रमाणात मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सिंचन विहीर, शेततळे, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे अशा काही वैयक्तिक लाभाच्या योजना रोहयो विभागामार्फत राबविण्यात येतात. यासाठीचे सिमेंट, वीट, वाळू, स्टील इत्यादी साहित्य खरेदीसाठीचा निधी लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावर देण्यात येणार आहे,अशी माहिती रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत आज दिली.

वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी या आधी ग्रामपंचायतींमार्फत साहित्य खरेदी करून लाभार्थ्यांना पुरविले जात होते. शासनाकडून ग्रामपंचायतीमार्फत विक्रेत्यास निधी देण्यात येत होता. मात्र, विक्रेत्यांकडून शेतकरी लाभार्थ्यांना प्रदानास विलंब होत होता. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर योजनांचा लाभ मिळाल्यास योजनांना गती  येईल, म्हणून यापुढे आता साहित्य खरेदीसाठीचे कुशल पेमेंट थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी लाभार्थ्यालाच वेंडर म्हणून नियुक्त करण्याचा मानस आहे. लाभार्थ्याने स्वखर्चाने साहित्य खरेदी केल्यानंतर त्याचे देयक ग्रामरोजगार सेवकाकडे जमा करावे, त्यानंतर 7 दिवसांच्या आत या देयकांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असे रावल यांनी सांगितले.

  • रोहयोचे ई-मस्टर आता ग्रामपंचायत स्तरावर

मजूरांची मागणी व काम सुरू करण्यामध्ये होत असलेल्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ई – मस्टर आता तालुका स्तराऐवजी ग्रामपंचायत स्तरावरूनच काढण्याचा निर्णय रोहयो विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे मजुरांना आपली मजूरी वेळेत  म्हणजे 15 दिवसांच्या आत मिळणार असल्याचे रावल यांनी सांगितले.

0
0
  • TAGS
  • rojgar hami yojana payment direct transfer to bank account
SHARE
Facebook
Twitter
  • tweet
Previous article स्मार्टसिटीसाठी आणखी 30 शहरांची निवड
Next articleअपंग प्रमाणपत्रासाठी झीरो पेंडन्सी अभियान
Siddharth Haralkar

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

ठळक बातम्या

ठाणे जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी भव्य ‘रोजगार महाकुंभ’

ठळक बातम्या

जुलै 2025 मधील नमुंमपा पदभरती परीक्षेच्या निकालाचा मार्ग उच्च न्यायालयाच्या आदेशाने खुला

ठळक बातम्या

नवी मुंबईत एफडीए आणि नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई

News Archives

MOST POPULAR

तथाकथित जी-23 नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर: नाना पटोले

August 30, 2022

डॉ. किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या आंदोलन

March 5, 2017

तळोजात 5 घरे जळून खाक

April 10, 2017

सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

October 15, 2023
Load more

HOT NEWS

मुंबई आणि उपनगर

मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या (28 मे) मेगाब्लॉक

ठळक बातम्या

बचतगटांच्या उत्पादनांसाठी लवकरच ‘ई पोर्टल’

माझे मत

माझे मत

इतर बातम्या

‘माझी वसुंधरा’ अभियानाची सुरुवात शासकीय कार्यालयांमधून व्हावी

ABOUT US
Avirat Vaatchal is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: aviratvaatchalnews@gmail.com
FOLLOW US
© Copyright 2016 - 2024 Avirat Vaatchal | All Rights Reserved | Design and Developed by Websteer Technologies
error: Content is protected !!
MORE STORIES

निकालानंतर मुख्यमंत्री मातोश्रीवर

May 24, 2019

विजय सिंघल यांनी ठाणे मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला

March 20, 2020