वाशी रेल्वे स्टेशन पूर्वेकडे सिडको मार्फत विविध पायाभूत सुविधांच्या कामांचे भूमिपूजन

भाजप नेते दशरथ भगत आणि माजी नगरसेविका वैजयंती भगत यांच्या पाठपुराव्याला यश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १५ डिसेंबर २०२२

वाशी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील सानपाडा पामबीच वसाहतीतील १, १३ ते १९ अश्या एकूण नऊ सेक्टर्स मधील नागरिकांना वाशी रेल्वे स्टेशनहुन रेल्वेने प्रवास करताना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामांचे भूमीपुजन सिडकोमार्फत करण्यात  आले.

काही महिन्यांपूर्वी दशरथ भगत व स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत यांनी सिडको भवना समोर सिडको प्रशासना विरोधात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणाला उपस्थित राहून आमदार गणेश नाईक यांनी पाठींबा दिला होता. या  पाठपुराव्याची दखल सिडको प्रशासनाने घेतली आणि या ठिकणच्या पायाभूत सुविधांची कामे ज्यामध्ये डांबरी रस्ता, स्ट्रॉम ड्रेनेज लाईन (गटार) व पदपथाचे काम करण्यास सुरुवात केली आहे. या विकास कामांचा भूमिपूजन आज सानपाडा सोनखार पामबीच विभागातील नागरिकांच्या उपस्थितीत माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व वैजयंती भगत करण्यात आले.

दशरत भगत आणि वैजयंती भगत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोमार्फत विकास कामे सुरु करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी दशरथ भगत आणि वैजयंती भगत यांचे आभार मानले आहेत.

=================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप