हार्बर मार्गावरील आजचा (25 जून) मेगाब्लॉक रद्द

मुंबई, 25 जून 2017/AV News Bureau:

मध्य रेल्वेच्या हार्बरमार्गावर आज (25 जून) घोषित करण्यात आलेला मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र मेन लाइनवरील विशेष ब्लॉक कायम राहणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळवळे आहे.

रेल्वे मार्गाची देखभाल तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला होता. कुर्ला ते वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात हा मेगाब्लॉक होता. मात्र हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासि यांनी दिली.