ग्रॅंड सेंट्रलमध्ये रंगला लाईव्ह कॉन्सर्ट

नवी मुंबई, 11 एप्रिल 2017/AV News Bureau:

सीवुडस् येथे नव्याने सुरू झालेल्या सीवुडस् ग्रॅंड सेंट्रल मॉलमध्ये पहिल्यांदाच नुकतेच एका लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिध्द गायक पपोन आणि जोनिता गांधी यांनी विविध गाणी सादर केली. या  कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी मुंबईकरांनी एका संगीतमय संध्याकाळचा अनुभव घेतला. पपोन आणि जोनिता गांधी यांनी सादर केलेल्या प्रत्येक गाण्यांना हजारोंच्या संख्य़ेने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना दाद दिली. त्यापैकी लंडन ठुमकता, तुम हाय या गाण्यांवर जोनीतासोबत तर पपोन यांनी सादर केलेल्या मोह मोह के धागे, भुलिया या गाण्यांवर प्रेक्षकांनी टाळ्यांनी साथ दिली.

Papon 2

संगीत लोकांना एकमेकांशी बांधून ठेवते. संगीतामुळे अनोळखी समुदाय एकत्र येऊन त्यांच्यात एक सुंदर बंधन तयार होते याचा अनुभव या लाईव्ह कॉन्सर्टच्या निमित्ताने लोकांना देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती नेक्सस मॉल चे मुख्य विपणन अधिकारी निशांक जोशी यांनी यावेळी सांगितले.