‘लष्कर’च्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीर, 1 जुलै :

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच असून लष्करांनी आज अनंतनाग जिल्ह्यात केलेल्या धडक कारवाईत लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर बशीर लष्करीसह आणखी एका दहशताद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले. बशीर लष्करीसह आणि तीन दहशतवादी आज सकाळी एका गावातील घरात लपून बसले होते. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत उडालेल्या चकमकीत बशीर ठार झाला. गेल्या काही दिवसांत भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईअंतर्गत हे मोठे यश मानले जात आहे.

16 जून रोजी दक्षिण काश्मीरमधील अचबल भागात या दहशतवाद्यांनी पाच पोलिसांसह एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या केली होती.  अनंतनाग जिल्ह्यातील ब्रेंटी-बाटपोरा भागात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी व्यापक प्रमाणात शोध मोहीम सुरू केली  आहे. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केल्यामुळे जवानांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांनी घरातील नागरिकांनाच ढाल केल्यामुळे जवानांना कारवाई करताना अडचण आली. त्यामुळे या चकमकीदरम्यान एका महिलेसह दोनजण ठार झाल्याचे वृत्त आहे.