मेन, हार्बरवर उद्या (2 जुलै) मेगाब्लॉक

नवी मुंबई, 1 जुलै 2017 /AV News Bureau:

रेल्वे मार्गाची देखभाल तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेतर्फे मेन आणि हार्बर मार्गावर उद्या (2 जुलै) मेगाब्लॉक जाहीर केल्याचे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

माटुंगा-मुलुंड स्लो मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 पर्यंत मेगाब्लॉक

  • सकाळी ११.१२ ते दुपारी ४.२७ या काळात माटुंगा येथून सुटणाऱ्या डाउन स्लो गाड्या माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन फास्ट मार्गावर चालविण्यात येतील आणि सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप तसेच मुलुंड स्थानकांवर थांबविण्यात येईल. मुलुंडहून पुढे जाणाऱ्या सर्व डाउन मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकापासून पुन्हा स्लो डाउन मार्गावरून चालविण्यात येतील.
  • मेगाब्लॉकच्या काळात डाउन स्लो मार्गावरील गाड्या विद्याविहार, कांजुरमार्ग आणि नाहुर स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांना घाटकोपर,भांडुप, मुलुंड मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • सकाळी 11.22 ते दुपारी 3.28 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप फास्ट गाड्या आपल्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यामुळे या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 10.48 ते दुपारी 54 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या डाउन फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या डाउन स्लो गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • नेरुळ-पनवेल अप आणि डाउन हार्बर लाइन सकाळी 11.20 ते दुपारी 4 या काळात बंद राहतील.
  • सकाळी 11.01 ते दुपारी 4.26 या काळात नेरुळहून पनवेल, बेलापूरला जाणाऱ्या सर्व डाउन गाड्या तसेच सकाळी 11.14 ते दुपारी 4.15 या काळात पनवेल, बेलापूरहून सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या बंद राहतील.
  • सकाळी 11.42 ते दुपारी 4.04 या काळात नेरुळहून पनवेल,बेलापूरला जाणाऱ्या सर्व डाउन ट्रान्सहार्बर गाड्या आणि सकाळी 11.4 ते दुपारी 3.53 या काळात पनवेल, बेलापुरहून ठाण्याला जाणाऱ्या गाड्या बंद राहतील.
  • मेगाब्लॉकदरम्यान पनवेल/ अंधेरी गाड्या बंद राहतील.
  • मेगाब्लॉकदरम्यान सीएसटी-नेरुळ आणि ठाणे –नेरुळ या मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतील, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.