दिव्यांगासाठी मोफत संगणक, व्यवसाय प्रशिक्षण

मुंबई, 30 जून 2017/AV News Bureau:

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत मिरज येथील शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह या संस्थेच्यामार्फत सन 2017-18 च्या चालू शैक्षणिक वर्षासाठी दिव्यांगांना मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

  • संस्थेतील प्रवेशासाठी अभ्यासक्रमाचे नाव व शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफीस (संगणक कोर्स)-किमान 8वी पास,

मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स)-किमान 9वी पास,

एम.एस.सी.आय.टी. (संगणक कोर्स) यांचा प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा असून वयोमर्यादा ही 16 ते 40 वर्ष अशी आहे. या संस्थेमध्ये फक्त दिव्यांग मुलानांच प्रवेश दिला जाणार आहे.

  • संस्थेमध्ये मुलांना प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात आली आहे. अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ निदेशक संस्थेला लाभले आहे.
  • यासाठी प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ अंपग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली, पिनकोड क्र. 416410, दूरध्वनी क्र. 0233-2222908, मोबाईल क्र. 9922577561/9975375557 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील.
  • प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, अंपगत्व असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व उत्पनाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती सोबत जोडाव्यात.
  • प्रवेश अर्ज संस्थेकडे दि. 31 जुलै 2017 पूर्वी पोहचतील याची दक्षता घ्यावी. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल, असे शासकीय प्रौढ अंपग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाचे अधीक्षक यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.