नवी मुंबई, कामोठेत उद्या पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई, 28 जुलै 2017/AV News  bureau :

भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पॅनलच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा शनिवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 05 तास बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात शनिवार दिनांक 29 जुलै 2017 रोजी पाणीपुरवठा होणार नाही.

भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रातील 22 के.व्ही. व 3.3 के.व्ही. विद्युत पॅनलच्या दुरुस्तीचे आणि इतर अनुषंगिक कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. रविवार दिनांक 30 पासून नियमित पाणी पुरवठा होईल. या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.