महिलांसाठी अल्पदरात शिवणकला अभ्यासक्रम

नवी मुंबई, 3 जुलै 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत शिवणकलेची आवड व शिक्षण घेण्याची पात्रता असणा-या इच्छुक महिला व मुलींकरीता टेलरिंग क्लास सुविधा नाममात्र शुल्कात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

शिवणकलेचा सहामाही व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येत असून जुलै ते डिसेंबर 2017 असे प्रवेश सत्र असणार आहे. ‘शिवण-कर्तन’ या अभ्यासक्रमाकरीता 7 वी उत्तीर्ण, तसेच ‘स्पेशलायझेशन इन ब्लाऊज’ या अभ्यासक्रमाकरीता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यासोबतच शिवण-कर्तन अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमात उपलब्ध आहे. प्रवेश प्रक्रियेकरीता शाळेचा दाखला व गुणपत्रक असणे आवश्यक आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असणा-या लाभार्थ्यांनाच सदरचे प्रशिक्षण घेता येणार आहे.

  • सदर अभ्यासक्रमध्ये शिवण प्रशिक्षणाकरीता प्रवेश घेताना वास्तव्याचा पुरावा – मालमत्ता कराची पावती/मतदान कार्ड/आधार कार्ड/रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला आवश्यक आहे.
  • प्रवेश अर्ज भरण्याचा कालावधी 04 जुलै ते 29 जुलैपर्यंत आहे.
  • इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 27563505 या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा.
  • 29 जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरणा-यास रु.300/- इतके प्रवेश शुल्क आकारले जाईल तर 29 जुलैनंतर अर्ज सादर केल्यास 8 ऑगस्टपर्यंत रु.350/- विलंब शुल्क आकारले जाईल.
  • 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये अर्ज सादर केल्यास अतिविलंब शुल्क म्हणून 500/- रुपये इतके प्रवेशशुल्क आकारण्यात येईल.

अर्ज मिळण्याचे ठिकाण

  • नवी मुंबई महानगरपालिका टेलरिंग क्लास, दत्तगुरुनगर, नमुंमपा ग्रंथालय, दुसरा मजला, से. 15, वाशी नवी मुंबई. (वर्गशिक्षिका-9867185830),
  • जुने ग्रामपंचायत कार्यालय, खैरणे, बोनकोडे, नवी मुंबई (वर्ग शिक्षिका- 9769901354),
  • नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, सेक्टर 11, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई (श्री. दादासाहेब भोसले, समाजसेवक 9702974123) येथे उपलब्ध आहेत.

या अभ्यासक्रमास प्रवेश देणे अथवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार महापालिका आयुक्त यांना आहे. सदरचे प्रशिक्षण मोफत असून लाभार्थ्यांनी केवळ शासनाची ठरलेली परीक्षा फी भरणे आवश्यक आहे.