कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मुंबई, 2 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांकडून टोल न आकारण्याचा निर्णय  घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आगामी गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट देणे व सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनेबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात झाली, यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्दे

  • कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना दि.22, 23 आणि 24  ऑगस्ट रोजी आणि दि. 1, 2, 3  आणि 4 सप्टेंबर रोजी पथकरातून सूट देण्यात येणार आहे.
  • परिवहन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना पासेस आणि स्टिकर द्यावेत.
  • सायन-पनवेल, खोपोली-पाली-वाकण रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत.
  • गर्दीच्या वेळी जड वाहनांची वाहतूक बंद ठेवावी, क्रेन आणि रुग्णवहिका सेवा तयार ठेवाव्यात, अशा सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.