म.फुले मंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करा

महामंडळातर्फे गरजूंना आवाहन

मुंबई, 11 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या राज्य शासन पुरस्कृत 50 टक्के अनुदान योजना व बीज-भांडवल योजनांचा 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये लाभ घेण्यास इच्छूक  व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • महामंडळाकडून कर्ज घेण्याकरिता अर्जदारांनी स्वत:चे ई-मेल अकाऊंट वापरुन ऑनलाईन पद्धतीने 15 सप्टेंबरपर्यंत कर्ज मिळण्याकरिता अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी 14 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मूळ प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित/स्वयंसाक्षांकित प्रती जिल्हा कार्यालयात स्वत: सादर कराव्यात. त्रयस्थ व्यक्तींकडून अर्ज किंवा इतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे. www.mahatmaphulecorporation.com/application या संकेतस्थळावरApplication Form Submission वर क्लिक करा. त्यात दिलेली सर्व माहिती भरुन झाल्यानंतर खाली Submit your application वर क्लिक करा. जर तुम्ही पूर्ण माहिती भरली नसेल तर अर्ज Submit होणार नाही व कोणती माहिती भरलेली नाही हे Screen वर दिसेल.त्यामुळे अर्जदारांनी काळजीपूर्वक आपले अर्ज भरावे,असे आवाहन करण्यात आले आहे.