जुईनगरमध्ये जनजागृतीसोबत मास्क आणि सॅनिटायजरचे वाटप

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरात राहण्याचे भाजप युवा नेते विजय साळे यांचे आवाहन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २१ मार्च २०२०

सध्या सर्वत्र कोरोनाच्या संसर्गाने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. यापार्श्वभूमीवर जुईनगर परिसरात स्थानिक समाजसेवक आणि भाजपचे युवा नेते विजय साळे यांच्यावतीने  कोरोना आजाराशी दोन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायजरचे मोफत वितरण करण्यात आले.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तसेच प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरातच राहण्यावर भर द्यावा. तसेच स्वच्छतेवर अधिकाधिक भर देण्याचे आवाहन साळे यांनी केले.

सध्या परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहीजे. आपले कर्तव्य समजूनच नागरिकांना मास्क आणि सॅनिटायजर देण्यावर भर दिल्याचे विजय साळे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद देत २२ मार्च रोजी दिवसभर घरात रहावे आणि कोरोनाचे आक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करावे, असेही साळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

=====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा