बेगम अख्तर यांना गुगलची डुडल द्वारे श्रध्दांजली

नवी मुंबई, 7 ऑक्टोबर 2017/AV News Bureau: googles-doodle-on-begum-akhtar

‘मल्लिका-ए-गझल’ बेगम अख्तर यांच्या 103 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने सर्च इंजिन गुगल ने डुडल द्वारे त्यांना श्रध्दांजली दिली आहे. हातात सतार असलेला त्यांचा डुडल बनविण्यात आला आहे.

7 ऑक्टोबर 1914 साली उत्तर प्रदेशमधील फैजाबाद जिल्हात बेगम अख्तर यांचा जन्म झाला होता.  अख्तरीबाई फैझाबादी अर्थात बेगम अख्तर म्हणून त्या प्रसिध्द होत्या. दादरा, ठुमरी आणि गझल यांमध्ये त्यांचा हातखंडा होता. ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.

नसीब का चक्कर, द म्युझिक रूम, रोटी, दाना-पानी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केले होते.

तिरुअनंतपुरमजवळील बलरामपुरममधील शेवटच्या मैफिलीच्या दरम्यान,  त्यांचा आवाजात थोडासा कंप निर्माण झाला. या कारणामुळे त्यांची तब्येत ढासळली. उपचारा दरम्यान 30 ऑक्टोबर 1974 रोजी त्यांचा मृत्यू झाला.