मत्स्यव्यवसाय, नौकानयन व इंजिन देखभाल प्रशिक्षण वर्ग

मुंबई, 14 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत 6 महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी 26 डिसेंबरपर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत.

1 जानेवारी 2018 ते 31 जुलै 2018 या कालावधीत शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई महानगर, मुंबई-400061 येथे हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत.

  • या प्रशिक्षणासाठी दरमहा रु.450/- इतके प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • द्रारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थींना दरमहा 100 रुपये प्रशिक्षण शुल्क  असेल.
  • इच्छुक उमेदवारांनी वरील पत्त्यावर 26 डिसेंबर, 2017 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.