17 डिसेंबर रोजी शिवडी येथे रोजगार मेळावा

  • 200 हून अधिक रिक्त पदे भरणार

मुंबई, 15 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या सयुक्त विद्यामाने बेरोजगार तरुण, तरुणींसाठी रोजगार मिळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे, म्युन्सिपल प्रायमरी स्कुल येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • दहावी पास/नापास/12 वी पास/पदवीधर/पदव्युत्तर/पदवीधारक/आय टी आय/एन.सी.टी.व्हि.टी. धारक यांच्यासाठी हा रोजगार मेळावा आहे. 
  • या रोजगार मेळाव्यास खाजगी क्षेत्रातील उद्योजक प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत.
  • या मेळाव्यात विविध क्षेत्रात किमान 200 हून अधिक रिक्तपदाची भरती होणार आहे.

बेरोजगार उमेदवारांनी आपल्या शैक्षिणिक कागदपत्र व नोंदणी कार्ड/फोटो व चार बायोडाटासह या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून या संधीचा जास्ती-जास्त लाभ घ्यावा असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर चे सहाय्यक संचालक शा.गि.पवार यांनी केले आहे.