उलवे येथील समाजसेवक किरण मढवी यांचा मरणोत्तर नेत्रदान संकल्प

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • उरण, १० जून २०२०
जागतिक दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून उलवे येथील समाजसेवक किरण एकनाथ मढवी यांनी  लक्ष्मी चँरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या येथे मरनोत्तर नेत्रदान संकल्प अर्ज भरुन नेत्रदान करण्याचे निर्धार केले. त्याप्रसंगी किरण मढवी यांना प्रमाणपत्र  डॉ. सचिन भुमकर, डॉ. भुपेश जैन आणि डॉ. रिटा धामणकर यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
यावेळी लक्ष्मी चँरिटेबल ट्रस्टचे समाजिक कार्यकर्ते  विनोद पाचघरे सर आणि समाजसेवक प्रकाश पाटील सर आणि मनोज पाटील सर आदी उपस्थित होते. यावेळी लक्ष्मी चँरिटेबल ट्रस्टनी समाजसेवक किरण मढवी यांच्या या कार्याबद्दल कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  • ======================================================
  • इतर बातम्यांचाही मागोवा