अंगणेवाडी जत्रेसाठी विशेष गाड्या

नवी मुंबई, 3 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

कोकणातील अंगणेवाडी जत्रेला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या सहाय्याने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसएमटीहून सावंतवाडीपर्यंत या गाड्या सोडण्यात येणार आहेत. special trains for anganewadi jatra

गाडी क्रमांक 01161/01162 लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष

  • गाडी क्रमांक 01161 ही गाडी 26 जानेवारीला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री 1.10 ला सुटून त्याच दिवशी सकाळी 10.30 ला सावंतवाडी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01162 ही गाडी 26 जानेवारीला सावंतवाडी येथून दुपारी 12.30 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 10.20 ला लोकमान्य टिळक टर्मिनस  येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल,रोहा, खेड, चिपळुण,रत्नागिरी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 22 डबे जोडण्यात येणार असून त्यामध्ये टू टायर एसी 1, थ्री टायर एसी 3, स्लीपर क्लास 13, जनरल डबे 3, जनरेटर व एसएलआरचे 2 डबे

गाडी क्रमांक 01157/01158 मुंबई सीएसएमटी -सावंतवाडी- मुंबई सीएसएमटी विशेष

  • गाडी क्रमांक 01157 ही गाडी 27 जानेवारीला मुंबई सीएसएमटी येथून मध्यरात्री 12.20 ला सुटून त्याच दिवशी सकाळी 10.30 ला सावंतवाडी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01168 ही गाडी 27 जानेवारीला सावंतवाडी येथून दुपारी 2 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 11.55 ला मुंबई सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.

 गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल,रोहा, खेड, चिपळुण,रत्नागिरी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 18 डबे जोडण्यात येणार असून त्यामध्ये थ्री टायर एसी 3, स्लीपर क्लास 5, जनरल डबे 6, जनरेटर व एसएलआरचे 2 डबे

गाडी क्रमांक 01162 सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस आणि गाडी क्रमांक 01158 सावंतवाडी रोड-मुंबई सीएसएमटी या गाड्यांचे तिकिट बूकिंग 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे.