मनपा उपायुक्तपदी नितीन काळे ?

  • नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणार

नवी मुंबई, 29 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

नवी मुंबई महापालिकेत रिक्त असलेल्या उपायुक्तपदी नितीन काळे यांची नियुक्ती केली जाणार आहे. काळे हे प्रतिनियुक्तीवर महापालिकेच्या सेवेत दाखल होणार असून त्याबाबतचा आदेश नगरविकास खात्याने दिला आहे. नितीन काळे  म्हाडा को. ऑ.सोसायटी रिडेव्हलपमेंट विभागात डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहेत. तिथल्या कामाचा प्रदिर्घ अनुभव त्यांना आहे.

नवी मुंबई महापालिकेतील रिक्त  उपायुक्तपद भरण्याबाबत महापालिका प्रशासनाने नगरविकास खात्याकडे विनंती केली होती.

नवी मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या सिडको इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामाला काळे यांच्या अनुभवाचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.