सिडकोमध्ये नोकर भरती

  • वर्ग 2 व 3 मधील रिक्त पदांसाठी अर्ज मागवले

नवी मुंबई, 9 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

सिडकोमध्ये लवकरच नोकर भरती होणार आहे. वर्ग 2 व 3 मधील रिक्त पदे भरण्यासाठी सिडको महामंडळाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 7 नोव्हेंबरपासून अर्ज ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. संकेतस्थळावरील  ‘करिअर’ या टॅब वर क्लिक करून 27 नोव्हेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत.

अर्ज मागवलेली रिक्त पदे

  1. आज्ञावलीकार (प्रोग्रॅमर) पदासाठी 1
  2. क्षेत्र अधिकारी (सामान्य) पदासाठी 4
  3. क्षेत्र अधिकारी (सामाजिक सेवा) पदासाठी 1
  4. संगणक चालक (कॉम्प्युटर ऑपरेटर) पदासाठी 3
  5. लिपिक-टंकलेखक पदासाठी 27
  6. लेखा लिपिक पदासाठी 21

एकूण रिक्त पदांमध्ये काही पदांसाठी विविध प्रवर्गातील आरक्षण तर काही पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी काय करावे

  • रिक्त पदांसाठी अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम नोंदणी करून स्वतःचा पासपोर्ट साईझ फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
  • पुढच्या टप्प्यात ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया असून त्यानंतर ऑनलाईन प्रक्रीयेच्या माध्यमातून फी भरणे आवश्यक आहे. (या संदर्भातील विस्तृत माहिती www.cidco.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)
  • भर्ती प्रक्रीयेबद्दलची सर्व अद्ययावत माहिती तसेच परिक्षेसाठीच्या हॉल तिकीटची उपलब्धता व ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक याविषयीची सर्व माहिती वेळोवेळी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावरून पुरवली जाईल. इच्छुक उमेदवारांनी सिडको महामंडळाचे संकेतस्थळ वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.

ऑनलाइन परिक्षा घेणार 

  • रिक्त पदांच्या भर्तीसाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून सदर परिक्षा 200 गुणांची असणार आहे.
  • यामध्ये मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान, सामान्य/व्यावसायिक ज्ञान व तार्कीक परिक्षा (Test of Reasoning) घेण्यात येणार आहे. परिक्षा 120 मिनीटांची असेल
  • परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 45 टक्के गुणांची आवश्यकता आहे.
  • ऑनलाईन परिक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच केवळ कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल.

 

  • भरती प्रक्रिया आणि आरक्षणव इतर अटी
  • भर्ती प्रक्रीया, रिक्त पदे, आरक्षण व इतर अटी आणि शर्तींविषयी विस्तृत माहिती सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावरwww.cidco.maharashtra.gov.in उपलब्ध आहेत.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • सदर प्रक्रीयेविषयी कोणताही शंका असल्यास कार्मिक विभाग – 022-67918249 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.