गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वे उशिरापर्यंत धावणार

मुंबई,5 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने मेन आणि हार्बर मार्गावर 8 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 6 सप्टेंबर रोजी पहाटे चालविण्यात येणाऱ्या या विशेष गाड्या सीएसएमटी ते कल्याण,ठाणे आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यान सर्व रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत.

 मेन मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक (6 सप्टेंबर)

  • सीएसएमटीवरून पहाटे 1.30 वाजता सुटून कल्याण स्थानकात पहाटे 3 वाजता पोहोचणार
  • सीएसएमटीवरून पहाटे 2.30 वाजता सुटून ठाणे स्थानकात पहाटे 3.30 वाजता पोहोचणार
  • कल्याणवरून पहाटे 1वाजता सुटून सीएसएमटी स्थानकात पहाटे 2.30 वाजता पोहोचणार
  • ठाण्यावरून पहाटे 2 वाजता सुटून सीएसएमटी स्थानकात पहाटे 3 वाजता पोहोचणार

हार्बर मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक (6 सप्टेंबर)

  • सीएसएमटीवरून पहाटे 1.30 वाजता सुटून पनवेल स्थानकात पहाटे 2.30 वाजता पोहोचणार
  • सीएसएमटीवरून पहाटे 2.45 वाजता सुटून पनवेल स्थानकात पहाटे 4.05 वाजता पोहोचणार
  • पनवेलवरून पहाटे 1 वाजता सुटून सीएसएमटी स्थानकात पहाटे 2.20 वाजता पोहोचणार
  • पनवेलहून पहाटे 1.45 वाजता सुटून सीएसएमटी स्थानकात पहाटे 3.05 वाजता पोहोचणार