कोणत्याही कोळीवाड्याचे स्थलांतर होणार नाही

मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचे आश्वासन 

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 11 एप्रिल 2018:

ईपीआर’ योजनेच्या माध्यमातून कोळीवाड्यांचा विकासही करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणत्याही कोळीवाड्याचे स्थलांतर होणार नाही असे आश्वासन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज दिले. जमशेदजी बंदर (लोअर कुलाबा) येथील कोळी समाजाच्या बैठकीत ते बोलत होते.

कोळी समाजाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आधुनिक पद्धतीने मासेमारी करावी. ज्यामुळे समाजाचे जीवनमान उंचावेल आणि समाजाचा विकास होईल, असेही मत त्यांनी यावेळी  व्यक्त केले.

  • मासेमारी व्यवसायाला शेती व्यवसायाचा दर्जा देण्यासाठी लवकरच कायदा  करण्यात येणार आहे. तसेच ‘ईपीआर’ योजनेच्या माध्यमातून कोळीवाड्यांचा विकासही करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणत्याही कोळीवाड्याचे स्थलांतर होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.
  • लोअर कुलाबा बंदराचा पुन्हा शासनाच्या यादीत समावेश करण्यासाठी शासन स्तरावर कारवाई तत्काळ करण्यात येईल. तसेच कोळी समाजातील मुला-मुलींनी शिक्षण घ्यावे, मासेमारीचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करुन मासेमारी करावी यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे सांगितले.