सिंधुने कोरियन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2017/AV News Bureau: sindhu won korean badminton series

कोरिया ओपन सुपर सिरिजमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधु हिने जपानच्या नोजोमी ओकुहारा हिचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सेऊल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुने ओकुहारावर 22-20, 11-21, 21-18 ने मात करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सिंधुचे हे तिसरे सुपर सिरिजचे विजेतेपद आहे.

पीव्ही सिंधु आणि नोजोमी ओकुहारा या दोघी आठ वेळा एकमेकांसमोर उभ्या टाकल्या गेल्या. त्यामध्ये चार वेळा दोघींनी एकमेकींवर कुरघोडी केली आहे. कोरिअन स्पर्धेपूर्वी सिंधुवर दडपण होते. ग्लासगो येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतही नोजोमी ओकुहाराने सिंधुवर मात केली होती. मात्र आज कोणत्याही दडपणाखाली न खेळता सिंधुने नोजोमी ओकुहारावर जोरदार आक्रमण करीत जेतेपदाला गवसणी घातली आहे. या विजयामुळे जागतक क्रमवारीत सिंधुचे रॅंकींग सुधारेल.