4 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महापालिकेतर्फे रोजगार मेळावा

संग्रहीत छायाचित्र

 

नवी मुंबई, 2 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सुशिक्षत – बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा ही संकल्पना नजरेसमोर ठेवून ठाणे जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व दिनदयाळ अंत्योद्य योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 4 फेब्रुवारी  रोजी “भव्य रोजगार मेळावा व लाभार्थी नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शंकरराव विश्वासराव विद्यालय, नमुंमपा शाळा क्र. 28, मॉडर्न कॉलेजच्या जवळ, सेक्टर 15/16, वाशी येथे आयोजित करण्यात आले आहे. या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता इच्छुकांनी http://jobfairnmmcnulm.com या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. 

कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नामांकित कंपन्यांमार्फत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पात्र उमेदवारांना  सरळ मुलाखतीव्दारे प्रत्यक्ष निवड व तत्काळ नियुक्ती पत्र दिली जाणार आहेत.

यावेळी कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-यांसाठी समुपदेशन व मोफत कौशल्य प्रशिक्षणासाठी लाभार्थी नोंदणी केली जाणार असून करियर निवडीबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • मेळाव्याच्या दिवशी आधारकार्ड, निवडणुक ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज 3 फोटो व बायोडाटा या प्रकारची कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. या भव्य मेळाव्यामध्ये नाव नोंदणीकरीता 022-30161590 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा अन्यथा 9594622659 या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर आपले नाव व शिक्षण याची माहिती पाठवावी.